शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी देशाचे 30 हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 13:14 IST

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे.

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात भागीदारी देऊन देशाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले, आपल्या पदाचा असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणीही राहुल गांधी यांनी केला.

''भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात रिलायन्सचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याचे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी सांगितले होते. आता दसॉल्ट एव्हिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र भाजपाने अशा चौकशीस तयारी दर्शवली नाही. मोदी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले होते. मात्र आता तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. त्यांनी देशातील गरीब, शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. दरम्यान, या आरोपाचा आधार घेत राहुल गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले. राहुल गांधी म्हणाले, " मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी देशाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींना दिले आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत," तसेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. मीडियापार्टने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दसॉल्ट एव्हिएशनसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहारकरण्याची अट घालण्यात आली होती. भागीदारीसाठी रिलायन्सशिवाय अन्य कोणताही पर्याय दसॉल्ट एव्हिएशनला देण्यात आला नव्हता. दसॉल्ट एव्हिएशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर  नागपूर येथे ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता.   मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही स्वायत्तपणे रिलायन्सची निवड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी 50 टक्के ऑफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी  दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्स ग्रुपची निवड करण्यात आली, तसेच 10 फेब्रुवारी 2017 रोजी दसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL) या कंपनीची स्थापना करण्यात आली, असे स्पष्टीकरण दसॉ एव्हिएशनने दिले आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी