शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केली चोरी, राहुल गांधींचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:47 IST

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.

ठळक मुद्दे नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात चोरी कबूल केली हवाई दलाला न विचारता करारात बदल करण्यात आल्याचे तसेच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातल्याचे केंद्र सरकारने मान्य केलेराफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्राद्वारे माहिती सादर केली होती

नवी दिल्ली - राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्राद्वारे माहिती सादर केली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप करताना नरेंद्र मोदींनीसर्वोच्च न्यायालयात चोरी कबूल केली, असे म्हटले आहे. तसेच राफेल विमान करारप्रकरणी ''पिक्चर अभी बाकी है'' असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून राफेल विमान करारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निषाणा साधला आहे."सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चोरी कबूल केली आहे. ''सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात हवाई दलाला न विचारता करारात बदल करण्यात आल्याचे तसेच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे.''असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून घ्यायच्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीची माहिती देण्यास कुरकुर करणाऱ्या केंद्र सरकारने फक्त न्यायाधीशांना पाहण्यासाठी का होईना, पण ती सीलबंद लखोट्यात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. या विमानखरेदीच्या निर्णय प्रक्रियेसह किंमतीची माहितीही द्यावी, असा आदेश न्यायालयाने ३१ ऑक्टोबर रोजी दिला, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी किमतीची माहिती गोपनीय असल्याने ती उघड करण्यास विरोध केला होता. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आदेशात बदल न करता त्यांना सांगितले की, तर तसे प्रतिज्ञापत्र करा. आम्ही त्याचा विचार करू. त्यानंतर न्यायालयाचा रोष टाळण्यासाठी केंद्राने आज ती सादर केली. दरम्यान, रिलायन्सशी झालेल्या ऑफसेट कराराबाबत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही अनिल अंबानींच्या कंपनीत नव्हे, तर जॉईंट व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विमान निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे रिलायन्सला राफेल विमानाचं कंत्राट मिळाले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा केला आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय