शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: ‘राफेल दस्तावेजांवर फक्त सरकारचा विशेषाधिकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:34 IST

राफेल लढाऊ विमाने खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी मूळ याचिकाकर्त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या फाइलमधील ज्या दस्तावेजांचा आधार घेतला, त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी विशेषाधिकाराचा दावा केला.

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमाने खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे दिसत नाही, अशी ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निकालाच्या फेरविचारासाठी मूळ याचिकाकर्त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या फाइलमधील ज्या दस्तावेजांचा आधार घेतला, त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी विशेषाधिकाराचा दावा केला. याचिकाकर्त्यांनी दस्तावेज अधिकार नसताना मिळवून त्यांचा वापर केला असल्याने न्यायालय त्यांंचा विचार करू शकत नाही, असे प्रतिपादनही सरकारने केले.राफेल निकालाच्या फेरविचाराच्या दोन याचिका, मूळ निकालात दुरुस्ती करण्यासाठी सरकारने केलेला अर्ज व मूळ याचिकांच्या सुनावणीत असत्य व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी केलेला अर्ज या सर्वांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी सरकारने घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार खडाजंगी झाली. या आक्षेपाचा फैसला झाल्याखेरीज फेरविचार याचिकांवर विचार केला जाणार नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्या मुद्द्यापुरता युक्तिवाद झाल्यावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी दावा केला की, याचिकाकर्त्यांनी फेरविचार याचिकांसह दिलेले दस्तावेज सुरक्षेशी संबंधित व ‘प्रीव्हिलेज्ड’ वर्गात मोडणारे आहेत. सरकारच्या पूर्वानुमतीशिवाय त्यांचा वापर कोणी करू शकत नाही, माहिती अधिकार कायद्यानुसारही अशी माहिती न देण्याची सरकारला मुभा आहे. यावरून न्या. जोसेफ म्हणाले की, माहिती अधिकार कायदा हा सरकारी गोपनीयता कायद्याहून श्रेष्ठ आहे. भ्रष्टाचार व गैरव्यवहाराशी संबंधित माहिती सुरक्षेसारख्या विषयाची असली तरी सरकार ती दडवून ठेवू शकत नाही, असे हा कायदा सांगतो. हा संसदेने केलेला क्रांतीकारी कायदा आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय