शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Rafale Deal : ज्या दिवशी तपास सुरू होईल त्या दिवशी मोदी तुरुंगात जातील, राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:51 IST

 राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

इंदूर -  राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी नरेंद्र मोदी सरळ तुरुंगात जातील, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. मोदींना केवळ भ्रष्ट म्हटले जात नाही तर ते खरोखरच भ्रष्ट आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु असता कामा नयेत असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ''राफेल विमान करार हे भ्रष्टाचाराचे खुले प्रकरण आहे. ज्या दिवशी या प्रकरणाची चौकशी सुरू होईल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुरुंगात कधी पाठवायचे एवढाच प्रश्न बाकी राहील. दरम्यान, राफेल विमान कराराची फ्रान्समध्ये चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मोदींनी या करारामधून आपले मित्र अनिल अंबानीं यांना फायदा मिळवून देण्यासाठी नियम आणि कायद्यांचा भंग केला आहे. याशिवायही अनेक प्रकरणे आहेत. जी राफेल विमान करारापेक्षाही मोठी आहेत."  यावेळी सबरीमाला मंदिर प्रकरणाबाबत मात्र राहुल गांधी यांनी वेगळी भूमिका घेतली. केरळमध्ये माझ्या पक्षाची भूमिका तेथील महिला आणि पुरुषांच्या भावनात्मक मुद्याप्रमाणे आहे. मात्र या प्रकरणी माझं वैयक्तिक मत वेगळं आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मी प्रत्येक वर्गाचा नेता असून, हिंदू धर्माची माझी समज भाजपावाल्यांपेक्षा अधिक आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Narendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील