शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

रायबरेली घराणेशाहीमुक्त करणार- अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:11 IST

अमित शहांची टीका; विकासाच्या मार्गावर नेण्याचा दिला शब्द

रायबरेली : गांधी कुटुंबाचा गड समजल्या जाणाऱ्या रायबरेलीत दाखल झालेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले की, आमचा पक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघाला घराणेशाहीपासून मुक्त करुन विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल.येथे एका सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, रायबरेलीतून काँग्रेसचे मोठमोठे नेते निवडून आले. पण, स्वातंत्र्यानंतर येथे विकास दिसून आला नाही. फक्त घराणेशाही दिसली. रायबरेलीला घराणेशाहीपासून मुक्त करुन विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भाजप अभियान सुरु करेल. दरम्यान, मक्का मशिद स्फोट प्रकरणात असीमानंद यांची न्यायालयाने सुटका केली आहे. याचा उल्लेख करुन शहा म्हणाले की, राहुल गांधी यांना मी सांगू इच्छितो की, त्यांच्या नेत्यांनी भगवा दहशतवादाचा शब्दप्रयोग करुन हिंदूंना बदनाम करण्याचे जे काम केले आहे त्यासाठी देशाची माफी मागावी.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल, असा दावा करुन शहा म्हणाले की, २०१९ मध्ये देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच सरकार बनणार आहे. तत्पूर्वी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भाजप एखाद्या कुटुंबाचा वा जातीचा पक्ष नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात गरीबांचा विकास झाला आहे.घटनास्थळी लागली आगया सभेत शहा यांचे भाषण सुरु होण्यापूर्वीच आग लागल्यामुळे धावपळ उडाली. अधिकाºयांनी सांगितले की, या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात आले. मीडियासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्यासपीठावर होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाह