राधे माँला दोन आठवड्यांसाठी मुंबई हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: August 14, 2015 19:39 IST2015-08-14T17:13:35+5:302015-08-14T19:39:06+5:30

स्वयंघोषित संत राधे माँ हिला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटक होणार नाही असा आदेश देत दिलासा दिला आहे

Radhe Mamta's relief for Mumbai High Court for two weeks | राधे माँला दोन आठवड्यांसाठी मुंबई हायकोर्टाचा दिलासा

राधे माँला दोन आठवड्यांसाठी मुंबई हायकोर्टाचा दिलासा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - स्वयंघोषित संत राधे माँ हिला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटक होणार नाही असा आदेश देत दिलासा दिला आहे. राधे माँ व तिच्या भक्तांनी हुंड्यासाठी आपला छळ केला तसेच मानसिक त्रास दिला अशी तक्रार निकी गुप्ता यांनी केली आहे. राधे माण ही मुख्य आरोपी नसली तरी तिच्याभोवती असलेल्या वलयामुळे या खटल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबईतल्या दिंडोशी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी पोलीसांनी जवळपास पाच तास राधे माँकडे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली. मात्र, राधे माँला अटक न करण्याचा कोर्टाचा आदेश असल्यामुळे चौकशीनंतर राधे माँ निघून गेली. याआधी सत्र न्यायालयाने राधे माँला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता, त्यामुळे राधे माँला अटक होते की काय अशी उत्सुकता होती.
हायकोर्टाने दोन आठवड्यांसाठी दिलासा दिलेला असतानाच दर बुधवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास मात्र राधे माँला बजावले आहे.
अत्यंत हाय प्रोफाईल भक्तांच्या गराड्यामुळे तसेच चित्रविचित्र चाळ्यांमुळे राधे माँ चांगलीच चर्चेत असून एरवी फारसा प्रसिद्धीझोत नसलेल्या राधे माँच्या या प्रकरणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Radhe Mamta's relief for Mumbai High Court for two weeks