पद्मावतीच्या सेटवर राडा, भन्साळींना मारहाण
By Admin | Updated: January 27, 2017 19:37 IST2017-01-27T19:31:33+5:302017-01-27T19:37:31+5:30
जयपूरमध्ये 'पद्मावती' सिनेमाच्या शूटींगवेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजपूत समाजाशी संबंधित असलेल्या करणी संघटनेने हल्ला केला आहे

पद्मावतीच्या सेटवर राडा, भन्साळींना मारहाण
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 27 - जयपूरमध्ये 'पद्मावती' सिनेमाच्या शूटींगवेळी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर राजपूत समाजाशी संबंधित असलेल्या करणी संघटनेने हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी पद्मावतीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण केली. त्यांचे कपडे देखील पाडण्यात आले आहेत.
राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर सदर घटनेचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये राजपूत करणी सेनेचे कार्यकर्ते चित्रपटाच्या सेटवर चित्रिकरणाच्या सामानाची फेकाफेक करताना दिसत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या हिंसक विरोधामुळे संजय लीला भन्साळी यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. जयगढ येथे घडलेल्या या सर्व प्रकारानंतर काही काळासाठी पद्मावती या चित्रपटाचे चित्रिकरण काही काळासाठी थांबविण्यात आले होते.
या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहीद कपूर तिच्या पतीची, तर रणवीर अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहेत.