शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:26 IST

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

पाटणा-

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. "बिहारमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणा, तुम्हाला कुणी थांबवलंय?", असा संताप राबडी देवी यांनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत व्यक्त केला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जातात आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा होता. 

"राज्यात असा एकही जिल्हा नाही जिथं रोज खून आणि लूटमार होत नाही. सरकारच दुबळं आहे, सरकार मजबूत असतं तर या घटना घडल्या नसत्या. सरकार सक्षम असतं तर आम्हीही मदत केली असती", असं राबडी देवी म्हणाल्या. बिहारमध्ये योगी मॉडेल लागू करण्याच्या भाजप आमदारांच्या मागणीचीही राबडी देवी यांनी खिल्ली उडवली आणि म्हणाल्या, "नितीश कुमारांना तिकडे पाठवा आणि योगीजींना बिहारमध्ये आणा. तुम्हाला कुणी अडवलंय? डबल इंजिन सरकार आहे ना?"

'सरकारनं सारंकाही अधिकाऱ्यांवर सोडलं'"सरकारनं संपूर्ण राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोडलं आहे", अशी टीका राबडी देवी यांनी केली. विधानसभेत दारूबंदी दुरुस्ती विधेयक मांडण्याबाबत विचारले असता माजी मुख्यमंत्र्यांनीही टीका केली. "दारू बंदी कुठे आहे? दारू सर्वत्र उपलब्ध आहे. ६ वर्षे झाली, तुम्ही काय साध्य केलं?'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले आणि ते काहीही करू शकतात, असा टोला लगावला. 

'नितीश कुमार मोदींच्या पायावर पडले'नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींसमोर हात जोडून अभिवादन करताना आणि त्यांना वाकून नमस्कार केलेल्या प्रसंगावरुनही राबडी देवी यांनी टीका केली. "नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नितीश उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पाया पडणंही लाचारी नाही का?", असा हल्लाबोल राबडी देवींनी यावेळी केला.

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा