गावठी दारू अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30
पिंजर: पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या कावठा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी छापा टाकला. छाप्यात १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गावठी दारू अड्ड्यावर छापा
प ंजर: पिंजर पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या कावठा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी छापा टाकला. छाप्यात १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कावठा येथे अवैध गावठी दारूचा अड्डा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. अधिकार्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन छापा टाकला. छाप्यात १० लीटर गावठी दारू, ५७५ लीटर सडवा मोहा, रसायन जप्त केले. या प्रकरणी शेख शफी शेख मुनाफला अटक करण्यात आली. (वार्ताहर)फोटो. :- १५सीटीसीए०९: गावठी दारूच्या छाप्यातील जप्त मुद्देमाल व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी.