रब्बीच्या पेरण्यांना वेग
By Admin | Updated: December 20, 2014 22:26 IST2014-12-20T22:26:59+5:302014-12-20T22:26:59+5:30
६७ हजार हेक्टरवर झाल्या पेरण्या

रब्बीच्या पेरण्यांना वेग
६ हजार हेक्टरवर झाल्या पेरण्यानाशिक : अवकाळी पावसाने जिल्ातील शेतपिकांचे नुकसान झालेले असतानाच रब्बीच्या पेरण्यांना मात्र वेग आला असून, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या रब्बीच्या पेरण्या शनिवार (दि.२०) अखेर ६७ हजार ७५८ हेक्टर (५१ टक्के) क्षेत्रावर आटोपल्या.जिल्ात रब्बीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १ लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ६७ हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र गहू व हरभरा या पिकांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. रब्बी ज्वारीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १० हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी ४ हजार ८९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बी गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ७६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी ३४ हजार ८९ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. रब्बी मका पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २५०० असून, त्यापैकी १ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच रब्बी हरभरा पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ४० हजार ८०० असून, त्यापैकी २६ हजार ११ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात रब्बी हंगामाच्या ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)