शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कल्पनारम्य धाडस करणारे देश चालवू शकत नाहीत, मुखर्जींनी मोदींचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 09:47 IST

नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी बोलत होते.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले आहेत. विशेष म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील एका पुरस्कार सोहळ्यातच मुखर्जी यांनी नाव न घेता मोदींना लक्ष्य केलं. देशातील लोकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करेल आणि सोडवू शकेल, अशाच नेत्याची देशाला गरज आहे. केवळ कल्पनारम्य धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावरुन मुखर्जींनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. 

नवी दिल्लीतील कार्पोरेट एआयएमए मॅनेजिंग अवॉर्ड सोहळ्यात मुखर्जी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश गेल्या कित्येक वर्षांपासून दारिद्र्याची लढाई लढतो आहे. त्यासाठी कार्पोरेट क्षेत्राने पुढे आले पाहिजे, देशातील 1 टक्के लोकांकडे देशातील 60 टक्के पैसा असून ही चिंताजनक बाब आहे. आयएमएफच्या आकडेवाडीनुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. देशाची अर्थव्यवस्था ही युएसडी 2.69 ट्रिलियन्स एवढी आहे. सध्या मार्च 2019 चा भारताचा विकासदर 7.4 असून पुढील वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये हा विकासदर (जीडीपी) 7.6 टक्क्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही मुखर्जी यांनी म्हटले. देशातील कार्पोरेट वर्गाने पुढे येऊन देशातील बेरोजगारी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वैयक्तिक नव्हे, तर रोजगार निर्मित्ती, सामाजिक उपक्रम आणि देशाच्या अर्थिक विकासाची धोरणं राबविली पाहिजेत. त्यासोबतच आरोग्य क्षेत्राकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचे मुखर्जी यांनी या परिषदेत बोलताना म्हटले आहे.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरणNew Delhiनवी दिल्ली