सचिन व रेखाच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: August 9, 2014 01:54 IST2014-08-09T01:54:55+5:302014-08-09T01:54:55+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन व सिनेतारका रेखा या 2क्12 साली नामनिर्देशित केलेल्या सदस्यांनी संसदेत आतार्पयत अनुक्रमे फक्त तीन व सात दिवस आपली हजेरी लावली

Question mark on the absence of Sachin and the Parliament of the line | सचिन व रेखाच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

सचिन व रेखाच्या संसदेतील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

>राज्यसभेत मुद्दा उपस्थित : दोन वर्षात रेखा सात, तर सचिन फक्त तीन दिवस हजर
नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन व सिनेतारका रेखा या 2क्12 साली नामनिर्देशित केलेल्या सदस्यांनी संसदेत आतार्पयत अनुक्रमे फक्त तीन व सात दिवस आपली हजेरी लावली असून बाकीचे सर्व दिवस संसदेकडे पूर्णपणो पाठ फिरविली आहे. त्यांच्या या अनुपस्थितीवर संसद सदस्यांनी प्रश्नचिन्ह लावले असून अशा व्यक्तींना संसदेवर नियुक्त केले जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. माकपाचे के.पी. राजीव यांनी शुक्रवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या दोन प्रसिद्ध व्यक्तींनी अनुपस्थित राहताना तशी सूचना संसदेला दिली होती काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. 
यावर उत्तर देताना उपसभापती पी.जे. कुरियन यांनी, हा मुद्दा अन्य सदस्यांनीही उपस्थित केल्याचे सांगून त्याबाबतची सर्व माहिती गोळा केल्याचे म्हटले. सचिन तेंडुलकरला 2क्12 च्या एप्रिल महिन्यात नामनियुक्त करण्यात आले होते, तेव्हापासून त्याने आतार्पयत फक्त तीन वेळेस हजेरी लावली आहे. गेल्या 13 डिसेंबर 2क्13 ला सचिनची सभागृहातील हजेरी ही अखेरची हजेरी होती. याच धर्तीवर सिनेअभिनेत्री रेखालाही 2क्12 च्या एप्रिल महिन्यात राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले होते. रेखाने आतार्पयत 7 वेळेस सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला होता. रेखाने यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी हजेरी लावली होती. 
तेंडुलकर व रेखा यांनी संसदेत अतिशय कमी वेळा आपली हजेरी लावली व जेव्हा ते हजर होते तेव्हाही अगदी अल्पवेळेसाठी ते येथे थांबले होते, याकडेही सभागृहातील अनेक सदस्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी यांनी संसदेबाहेर हा मुद्दा उपस्थित केला होता. 
त्यांनी, अशा प्रकारे वारंवार अनुपस्थित राहणो हा संसद व भारतीय घटनेचा अवमान असल्याचे म्हटले. अशा लोकांना नियुक्तच केले जाऊ नये असे म्हणून, जे संसद सदस्य तेंडुलकर व रेखासोबत छायाचित्रे काढतात त्यांची दया येते, असेही मत व्यक्त केले. (लोकमत न्यूज नेटवर्क) 

Web Title: Question mark on the absence of Sachin and the Parliament of the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.