राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

(पान १)

The Queen's Ratnarna will be seen again | राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार

राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार

(प
ान १)
.............
राणीचा रत्नहार पुन्हा झळकणार
हायकोर्टाचे आदेश
मुंबई : मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर पुन्हा जुनेच पिवळे दिवे लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला दिले. त्यामुळे राणीच्या रत्नहाराने आता मरिन ड्राईव्ह पुन्हा झळाळणार आहे. तर पिवळे दिवे काढण्याचा निर्णय घेणार्‍या भाजपला चांगलाच दणका मिळला असून, शिवसेनेची सरशी झाली आहे.
मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. याआधीही न्यायालयाने येथे लागलेले एलईडी दिवे काढून पुन्हा पिवळे दिवे लावण्याची सूचना केली होती. याचा पुनरुच्चार गुरूवारी खंडपीठाने नव्याने केला. मात्र एलईडी दिव्यांमुळे येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रण स्पष्ट दिसते. यामुळे विजेची बचत होते व एलईडी दिवे कमी खर्चाचे आहेत, असा दावा राज्य शासनाने गुरूवारी खंडपीठासमोर केला.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शासनाने न्यायालयाने केलेल्या सुचनेचे समर्थन केले. तसेच न्यायालयाने आदेश दिल्यास आम्ही जुने दिवे लावू, असेही शासनाने स्पष्ट केले. त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. (प्रतिनिधी)
.....................
(चौकट)
शिवसेना-भाजपा वाद
१० कोटींची वीज वाचेल!
मुंबईतल्या रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला होता. रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरु केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता. भाजपप्रणित योजनेला शिवसेनेने विरोध दर्शविल्याने त्याचे राजकारणात पडसाद उमटले होते.
.....................
(चौकट)
भाजपाचा सूर
शिवसेनेने राणीचा रत्नहार असलेले दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लावला होता.
.....................
(चौकट)
भाजपाचा दावा
आजघडीला मुंबईत बेस्ट, एमएसईबी आणि रिलायन्सचे मिळून सुमारे १ लाख ३२ हजार ४५८ दिव्यांचे खांब आहेत. त्यासाठी महापालिका दरवर्षी १६४ कोटी रुपये वीज बील भरते. या दिव्यांमुळे दरवर्षी २० कोटी युनिट वीज जळते. मात्र एलईडी दिव्यांचा वापर सुरु झाल्यास यातील निम्मे म्हणजे १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता.
.....................

Web Title: The Queen's Ratnarna will be seen again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.