सेंट अँथनी स्पोर्टस् क्लब उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:35+5:302015-07-29T00:42:35+5:30

वास्को (क्रिडा प्रतिनिधी) : सेंट अँथनी स्पोर्टस् क्लब माजी शिवोलीने कुंकळी युनियनवर 4-3 गोलने विजय मिळवीत थिवी स्पोर्टस् क्लब आयोजित 18व्या अवरलेडी ऑफ मर्सीस कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

In the quarter-finals of St. Anthony Sports Club | सेंट अँथनी स्पोर्टस् क्लब उपांत्यपूर्व फेरीत

सेंट अँथनी स्पोर्टस् क्लब उपांत्यपूर्व फेरीत

स्को (क्रिडा प्रतिनिधी) : सेंट अँथनी स्पोर्टस् क्लब माजी शिवोलीने कुंकळी युनियनवर 4-3 गोलने विजय मिळवीत थिवी स्पोर्टस् क्लब आयोजित 18व्या अवरलेडी ऑफ मर्सीस कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
चिंचणी चर्च मैदानावरील आज खेळविण्यात आलेल्या लढतीत पुर्वाधातील 50व्या मिनीटाला फ्रान्सीस फर्नांडीसने विनायक पेडणेकरच्या पासावर गोल करीत सेंट अँथनी माणीचा 1-0 आघाडीवर नेले. लगेच 11व्या मिनिटाला अँडिसन डिकॉस्ताच्या पासावार सॅल्टन गोम्सने कुंकळ्ळी युनियनला 1-1 मध्यंतर पर्यंत 1-1 बरोबरीत नेले.
उत्तरार्धातील 40व्या मिनिटाला सेर्वीन लोबोने फ्रान्सीस फर्नांडीसच्या पासावर सेंट अँथनी माणीचा दुसरा गोल (2-1) नोंदविला 3-0 अशी आघाडी घेताना क्लॉयडियो रॉड्रीगीसने फ्रान्सीस फर्नांडीसच्या पासावर गोल केला. सेंट अँथनी माणीचा चौथा (4-0) गोल अँ... फर्नांडीसने .............. लोबोच्या पासावर केला. तर कुंकळी युनियनच्या पॅकसन डिकॉस्ताने मिकी फर्नांडीसच्या पासावर दुसरा गोल (4-2) केला तर तिसरा गोल दौलन्त देसाईने डिकॉस्ताच्या (4-3) पासावर केला.

Web Title: In the quarter-finals of St. Anthony Sports Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.