शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 16:22 IST

शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे.

हैदराबाद : शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील शेतकऱ्यानं हा पराक्रम केला आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, त्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात लाल बिकनी घातलेल्या सनी लिओनीचे एक पोस्टर लावले आहे. परिसरात या गोष्टीची चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यानं असा दावा केला आहे की, सनी लिओनीचे पोस्टर लावल्यानंतर शेतातील पिकामध्ये सुधारणा झाली आहे. नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली या गावातील ए.चेंचू रेड्डी  यांनी ही भन्नाट आयडिया केली आहे. शेतातील खराब होणाऱ्या पिकाला वाचवण्यासाठी त्यानं सनी लिओनीचं पोस्टर लावलं आहे. शेतीच्या दोन्ही बाजूला रेड्डी यांनी सनीचे पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवर 'मुझसे जलना मत' असे लिहण्यात आलं आहे. 

या आयडियावर बोलताना रेड्डी म्हणाले की, लोकांच्या मनात सनी लिओनीबद्दल आकर्षण आहे. म्हणूनच लोक शेतातील पिकाकडे न पाहता सनी लिओनीच्या पोस्टरकडे पाहतात. त्यामुळं वाईट नजरेपासून माझ्या पिकाचा बचाव होतोय. याचा फायदा मला मिळत आहे. सनी लिओनीचे फोस्टर लावल्यापासून पीक चांगलेच बहारले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बांदाकिंदिपल्ली या गावाच्या रस्त्यालगत रेड्डी यांची दहा एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी भाजीपाला लावला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते त्याची लागवड करत होते पण प्रत्येकवेळी पिक खराब होत असे आणि हवा तसा मोबदला मिळत नसे. 

टॅग्स :Sunny Leoneसनी लिऑनीFarmerशेतकरी