ति:होल यांना अर्थशास्त्रचे नोबेल
By Admin | Updated: October 14, 2014 02:02 IST2014-10-14T02:02:41+5:302014-10-14T02:02:41+5:30
बाजारपेठेची शक्ती व नियंत्रण या विषयावरील मौलिक संशोधनासाठी फ्रेंच अर्थतज्ज्ञ जाँ ति:होल यांना यावर्षीचा अर्थशास्त्रचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

ति:होल यांना अर्थशास्त्रचे नोबेल
स्टॉकहोम : बाजारपेठेची शक्ती व नियंत्रण या विषयावरील मौलिक संशोधनासाठी फ्रेंच अर्थतज्ज्ञ जाँ ति:होल यांना यावर्षीचा अर्थशास्त्रचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने तिरोल यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. काही शक्तिशाली संस्थांच्या मदतीने उद्योगावर कसे नियंत्रण मिळवावे, याचा बाजारपेठीय व्यावहारिक सिद्धांत मांडणारे 61 वर्षीय ति:होल फ्रान्समधील टुलूज स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये काम करतात.
नोबेलअंतर्गत दिल्या जाणा:या मूळ पुरस्कारात अर्थशास्त्रच्या नोबेलचा समावेश नव्हता. स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 साली हा पुरस्कार सुरू केला असून, तो नोबेल मालिकेतील इतर पुरस्कारांबरोबर दिला जातो. गतवर्षी हा पुरस्कार तीन अमेरिकन अर्थतज्ज्ञांना मिळाला होता.
1क् डिसेंबर रोजी या पुरस्कारांचे संस्थापक आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी पुरस्कारांचे वितरण होईल. 1क् डिसेंबर 1896 रोजी नोबेल यांचे निधन झाले होते. (वृत्तसंस्था)
4198क् च्या मध्यापासून ते पडलेल्या बाजाराचा अभ्यास करत आहेत. विविध उद्योगांचे विलीनीकरण व मक्तेदारी या संदर्भात सरकारची भूमिका यावर त्यांच्या संशोधनाचा प्रभाव आहे, असे अकादमीने म्हटले आहे. अशी धोरणो राबविण्यासंदर्भात ति:होल यांनी अनेक लेख व पुस्तके लिहिली आहेत. त्याचा उपयोग दूरसंचार ते बँकिंग क्षेत्रर्पयत अनेक उद्योगांना झालेला आहे.
4अर्थशास्त्रवरील नोबेल सर्वात अखेरीस जाहीर केले जाते. त्यानुसार या घोषणोसोबतच 2क्14 च्या नोबेल पुरस्कारांच्या घोषणांची पूर्तता झालेली आहे.