शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणच नाही, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीही पुतीन यांची भारत भेट  ठरणार महत्त्वपूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 10:15 IST

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे.

नवी दिल्ली - रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे. भारत आणि रशियामध्ये एस-400 क्षेपणास्त्र करार होण्याची शक्यता असल्याने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र केवळ संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनेच नव्हे तर अंतराळ संशोधन आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या दृष्टीनेही पुतीन यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात शुक्रवारी चर्चा होणार आहे. त्या चर्चेवेळी संरक्षण क्षेत्रातील भागीदारीबाबत चर्चा होऊन एस-400 क्षेपणास्र करारावर सह्या होण्याची शक्यता आहे. तसेच इतर महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवरही सहमती होऊ शकते. संरक्षण क्षेत्राबरोबरच अंतराळ संशोधनातील सहकार्याबाबत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये निर्णय होऊ शकतो. त्यामुळे 2022 साली चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या घोषणेला बळ मिळू शकेल. तसेच या मोहिमेसाठी रशिया साहित्य आणि प्रशिक्षण देऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.  पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील भागीदारीबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. भारताने रशियातील ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

दरम्यान, पुतीन यांच्या या दौ-याचा मुख्य उद्देश एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आहे. एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठीचा हा करार 5 अब्ज डॉलरचा होणार आहे. परंतु अमेरिकेचा या कराराला तीव्र विरोध आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौ-यात पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अधिकृतरीत्या चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. भारताची दरवर्षी होत असलेल्या द्विपक्षीय चर्चांमध्ये रशियाचाही समावेश आहे. तसेच भारताबरोबर दरवर्षी द्विपक्षीय चर्चा करणारा जपान हा दुसरा देश आहे. भारत-रशियादरम्यानच्या द्विपक्षीय संबंध हे विशेष महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndiaभारत