रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या दोन दिवसीय महत्त्वाच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पालम विमानतळावर पुतिन यांचे स्वागत केले. जागतिक स्तरावर अनेक भू-राजकीय बदल होत असताना आणि विशेषतः भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावपूर्ण झाले असताना पुतिन यांच्या या २३ व्या वार्षिक शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष लागले आहे.
शुक्रवारी होणाऱ्या शिखर परिषदेत द्विपक्षीय व्यापार वाढवणे, संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी देणे, आणि महत्त्वाचे म्हणजे बाह्य दबावापासून द्विपक्षीय व्यापाराचे रक्षण करणे यावर भर दिला जाईल. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी केल्यामुळे निर्माण झालेल्या व्यापार तुटीचा मुद्दा यावेळी प्रकर्षाने उपस्थित होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी २०२५ पर्यंत व्यापाराचा आकडा १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या परिषदेत लहान 'मॉड्यूलर अणुभट्ट्या'मधील संभाव्य सहकार्यासह १० आंतर-सरकारी दस्तावेज आणि १५ हून अधिक व्यावसायिक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
'रशिया आमचा सामरिक भागीदार'या भेटीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती असूनही, रशिया तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात भारताचा एक सामरिक भागीदार कायम आहे. तसेच, माजी परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, ही परिषद दोन्ही देशांतील संबंधांना उच्च पातळीवर एक नवी दिशा देईल आणि युरोपसह आशियातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी मिळेल.
राष्ट्राध्यक्ष पुतिन शुक्रवारच्या शिखर बैठकीनंतर राजघाटला भेट देतील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजकीय मेजवानीत सहभागी होतील. पुतिन यांचा हा २८ तासांचा दौरा भारत-रशिया भागीदारीला एक नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.
Web Summary : President Putin's India visit focuses on boosting trade, strengthening defense cooperation, and protecting bilateral trade. Discussions include addressing trade imbalances from India's oil purchases and aiming for $100 billion trade by 2025. Agreements on nuclear reactors and other sectors are expected.
Web Summary : राष्ट्रपति पुतिन की भारत यात्रा का उद्देश्य व्यापार बढ़ाना, रक्षा सहयोग मजबूत करना और द्विपक्षीय व्यापार की रक्षा करना है। भारत द्वारा तेल खरीद से व्यापार असंतुलन और 2025 तक 100 अरब डॉलर के व्यापार का लक्ष्य शामिल है। परमाणु रिएक्टरों पर समझौते की उम्मीद है।