शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

"अहंकार बाजूला सारून तिन्ही कृषी कायदे तत्काळ मागे घ्या "

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:24 IST

Farmer Protest: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सरकारला आवाहन. लोकशाहीत जनभावनांची उपेक्षा करणारी सरकारे आणि त्यांचे नेते फार काळ सत्तेत राहू शकत नाहीत. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘थकवा आणि पळवून लावा’ धोरणासमोर आंदोलन करणारे शेतकरी-मजूर अजिबात गुडघे टेकणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अजूनही वेळ आहे. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कृषी कायदे परत घ्यावेत आणि थंडी आणि पावसात संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन समाप्त करावे. हाच राजधर्म आहे आणि दिवंगत शेतकऱ्यांना श्रद्धांजलीही, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

   आंदोलनाबाबत सरकार उदासीन असल्यामुळे आतापर्यंत ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले तरीही निर्दयी मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही की, आजपर्यंत मोदी किंवा कोणत्याही मंत्र्याने सांत्वन करणारा शब्दही उच्चारलेला नाही. मी सगळ्या दिवंगत शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करते व देवाकडे प्रार्थना करते की, त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती द्यावी, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या इतिहासात हे पहिलेच अहंकारी सरकार सत्तेत आले आहे की, ज्याला सामान्य जनता तर दूर देशाचे पोट भरणाऱ्यांच्या वेदना आणि ते करत असलेला संघर्ष दिसत नाही. असे दिसते की, मूठभर उद्योगपती आणि त्यांचा नफा सुनिश्चित करणे हे या सरकारचा मुख्य अजेंडा बनला आहे, अशी टिका सोनिया गांधी यांनी केली.

लोकशाहीत जनभावनांची उपेक्षा करणारी सरकारे आणि त्यांचे नेते फार काळ सत्तेत राहू शकत नाहीत. नरेंद्र मोदी सरकारच्या ‘थकवा आणि पळवून लावा’ धोरणासमोर आंदोलन करणारे शेतकरी-मजूर अजिबात गुडघे टेकणार नाहीत. दमन करून आपण सत्ता चालवू, हा या सरकारचा निधार्र  यशस्वी होणार नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कृषी कायदे परत घ्यावेत.  मोदी सरकारने हे लक्षात ठेवावे की, लोकशाहीचा अर्थच जनता आणि शेतकरी-मजुरांच्या हितांचे रक्षण करणे आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

आंदोलक शेतकऱ्यांच्या पावसाने वाढविल्या अडचणीn    केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरुद्ध एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी पावसाने वाढविल्या आहेत. रात्रभर झालेल्या पावसाने आंदोलनस्थळी ठिकठिकाणी पाणी साचले आहे.n    संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितले की, शेतकरी ज्या तंबूमध्ये राहत आहेत ते तंबू वॉटरप्रूफ आहेत; पण थंडी आणि त्यात पावसाची भर यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. पावसानंतर थंडीही वाढली आहे; पण सरकारला शेतकऱ्यांचा त्रास दिसत नाही.n    सिंघू बॉर्डरवर असलेले गुरविंदर सिंह यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तरीही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस झाले आहे, तर येथे २५ मिमी पाऊस झाला आहे. ६ जानेवारीपर्यंत या भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी