साठविण्यासाठी गोडावून नसल्याने हमीभाव भात खरेदी बारगळली
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
राजेश भांगे

साठविण्यासाठी गोडावून नसल्याने हमीभाव भात खरेदी बारगळली
र जेश भांगे शिरोशी - तालुक्यातील ९० टक्के शेतकर्यांचे जीवन भातपिकावर अवलंबून असल्याने हमीभाव भातखरेदी केंद्राचे उद्घाटन आ.किसन कथोरे यांनी गुरूवारी धसई येथे केले. मात्र याठिकाणी भात खरेदी केलेला भात साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने हे भातखरेदी केंद्र बारगळल्याने शेतकर्यांना नाईलाजास्तव भात खाजगी व्यापार्यांकडे मातीमोल भावाने विकावा लागत आहे. दोन महिने झाले अद्याप आदिवासी विकास महामंडळाची हमी भाव भात खरेदी केंद्रे सुरू होत नसल्याने शेतकर्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने गुरु वारी या भात खरेदी केंद्राचे उद्घाटन धसई येथे केले होते़ मात्र आता ते ही बारगळ्याने शेतकर्यांना संताप व्यक्त होत आहे़....................................वाचली- नारायण जाधव