बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 12:37 PM2020-12-30T12:37:39+5:302020-12-30T12:38:12+5:30

Farmer News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Purchase of foodgrains at a higher rate than the market price, traders fleeing with crores of rupees to the farmers | बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

बाजारभावापेक्षा अधिक दराने धान्याची केली खरेदी, शेतकऱ्यांना कोट्यवधीचा गंडा घालून व्यापारी फरारी

Next

भोपाळ - एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलनासाठी बसले असताना दुसरीकडे मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यात एका कंपनीने सुमारे २२ शेतकऱ्यांशी धान्याबाबत करार केला. मात्र खरेदीनंतर शेतकऱ्यांना पैसे न देताच संबंधित कंपनी आणि व्यापारी फरार झाले. या शेतकऱ्यांनी मसूर-चण्याच्या धान्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र धान्यखरेदीनंतर शेतकऱ्यांना गंडा घातला.

मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील देवास येथील २२ शेतकऱ्यांना खोजा ट्रेडर्स या कंपनीसोबत करार केला होता. मात्र खरेदीचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्याचा पत्ताच नव्हता. त्रस्त शेतकऱ्यांनी जेव्हा व्यापाऱ्याचा शोध घेतला तेव्हा संबंधित व्यापाऱ्याने तीन महिन्यांच्या आतच आपल्या कंपनीचे रजिस्ट्रेशन संपुष्टात आणल्याचे समोर आले. आता याबाबत खातेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडेही लेखी तक्रार दिली आहे.

दरम्यान, आसपासच्या परिसरातील सुमारे १०० ते १५० शेतकऱ्यांसोबतसुद्धा अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित व्यापाऱ्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर आपली फसवणूक झाली असावी अशी शंका शेतकऱ्यांना आली. या खोजा ट्रेडर्स नामक कंपनीने शेतकऱ्यांकडून बाजारभावापेक्षा ७०० रुपये अधिक देऊन धान्याची खरेदी केली होती.

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांना पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितले की, खोजा ट्रेडर्सच्या दोन भावांनी आपले लायसन्स दाखवून आमच्याकडून धान्याची खरेदी केली. मात्र पैसे देण्याचे सांगितले. मात्र पैसे न आल्याने त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित व्यापाऱ्यांची नोंदच नसल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांच्या मदतीने या व्यापाऱ्यांचा शोध सुरू आहे, असे देवासच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Purchase of foodgrains at a higher rate than the market price, traders fleeing with crores of rupees to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.