शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Jaani Johan : "मी समोर अक्षरश: मृत्यू पाहिला अन्..."; भीषण अपघातानंतर गायक जानी जोहानची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:27 IST

Jaani Johan : मोहालीच्या सेक्टर 22 मध्ये दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यानंतर या अपघातात जानीची एसयुव्ही कार पलटी झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पंजाबी गायक आणि गीतकार जानी जोहान (Jaani Johan) याच्या गाडीचा भीषण अपघात (road accident) झाला. मोहालीच्या सेक्टर 22 मध्ये दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यानंतर या अपघातात जानीची एसयुव्ही कार पलटी झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर आता जानीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असून यामध्ये आपल्या तब्येतीची माहिती दिली. "आज मी समोर अक्षरश: मृत्यू पाहिला आणि नंतर देवाचं दर्शन झालं. मृत्यू आणि देव या दोघांना एकत्रच मी पाहिलं. मी आणि माझे मित्र ठीक आहोत" असं म्हटलं आहे. 

जानी जोहान "देवाच्या कृपेने अपघातावेळी कारमध्ये आम्ही जेवढे लोक होतो, ते सर्वजण ठीक आहोत. अधिकारी या प्रकरणात योग्य तो तपास करत आहेत आणि आम्हाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वाहेगुरु ने राख ले. वाहेगुरु दा शुक्र है" असं म्हटलं आहे. जानीने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

भीषण अपघातात जानी आणि त्याचे मित्र थोडक्यात बचावले. जानीसह त्याच्या मित्रांना थोडीफार दुखापत झाली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, जानीसह तिघं जण सेक्टर 91 च्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. जेव्हा ते सेक्टर 88 लाइट पॉइंटवर पोहोचले तेव्हा फोर्ड फिगोने त्यांच्या एसयूव्हीला धडक दिली. त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं. ही टक्कर इतकी जोरात होती की SUV तीनदा पलटी झाली. 

सुदैवाने एअर बॅग्समुळे प्रवाशांचे प्राण वाचले. गाडीतून तीन जणांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना मोहालीतील फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जानी हा पंजाब आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि गीतकार आहे. तितलियाँ, नाह, पछताओगे, धोकेबाज, क्या बात है, फिलहाल, फिलहाल 2 यांसारख्या गाण्यांसाठी तो प्रसिद्ध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघात