शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Election Dates : युपी, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 12:11 IST

UP, Pujab 5 States Elections : दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग देणार माहिती

UP, Pujab 5 States Elections : देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल लवकरच वाजणार आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल याचं चित्र स्पष्ट होईल. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे, ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत, अशाही परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका घेण्यावर ठाम आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. याचं कारण उत्तर प्रदेशातील कल लोकसभा निवडणुकांचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट करू शकतो, असं म्हटलं जातं. 

५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.  किती टप्प्यात असू शकते निवडणूक?उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात मतदान होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे. तर पंजाबमध्येही विधानसभा निवडणूक होत असून, त्या तीन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. तर, मणिपूर विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकतात. तर गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडू शकतील, असं म्हटलं जातंय.

टॅग्स :ElectionनिवडणूकPunjabपंजाबUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवा