पंजाबमध्ये संघाच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला

By Admin | Updated: August 7, 2016 04:51 IST2016-08-07T04:51:42+5:302016-08-07T04:51:42+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) जगदीश गंगेजा यांच्यावर दुचाकीस्वारांनी शनिवारी रात्री गोळीबार केला. ते पंजाब प्रांताचे सहसरसंघचालक आहेत.

In the Punjab, a senior leader was attacked | पंजाबमध्ये संघाच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला

पंजाबमध्ये संघाच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला

जालंधर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) जगदीश गंगेजा यांच्यावर दुचाकीस्वारांनी शनिवारी रात्री गोळीबार केला. ते पंजाब प्रांताचे सहसरसंघचालक आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांना तीन गोळ्या लागल्याचे आ. मनोरंजन कालिया यांनी सांगितले. पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदरसिंग यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

Web Title: In the Punjab, a senior leader was attacked