शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जत्रेत आला कोट्यवधींचा घोडा, सलमान खाननं लावली बोली, मालकानं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 22:53 IST

या जत्रेत चांगल्या जातीचे 300 घोडे आणि घोड्या आल्या होत्या. पंजाब शिवाय राजस्थानच्या जयपूर आणि अजमेरमधूनही येथे घोडे आले होते. या घोड्यांची किंमतही आश्चर्यकारक होती. या जत्रेत चांदी, मारवाडे आणि नुकरा जातीचे घोडे विशेष आकर्षणाचे केंद्र होते. (Punjab, Faridkot)

चंदीगड -पंजाबच्या फरीदकोट येथे आयोजित घोड्यांच्या जत्रेत पाच लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेले घोडे आले होते. या जत्रेत एक 'देव' (dev) नावाचा घोडाही आला होता. हा घोडा विकत घेण्यासाठी बॉलीवुड स्टार सलमान खानने ( Salman khan) कोट्यवधींची बोलीही लावली होती. मात्र, सलमान खानची ही बोली या घोड्याच्या मालकाने नाकारली. (Salman khan offers rejected horse owner paramveer)

या जत्रेत देवराज घोड्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. देवराजच्या मालकाचे नाव अमनदीप सन्नी गिल असे आहे. त्यांनी सांगितले, की देवराजपासून जन्माला आलेले पहिले पाच घोडे इंडियन चॅम्पियनशिपमध्ये विजयी झाले आहेत. यावेळी देवराजला विकत घेण्यासाठी अनेकांनी ब्लँक चेकही ऑफर केले. मात्र, त्यांनी हा घोडा विकला नाही. ते म्हणाले, देवराजला आम्ही शोक म्हणून पाळले आहे.

या जत्रेत चांगल्या जातीचे 300 घोडे आणि घोड्या आल्या होत्या. पंजाब शिवाय राजस्थानच्या जयपूर आणि अजमेरमधूनही येथे घोडे आले होते. या घोड्यांची किंमतही आश्चर्यकारक होती. या जत्रेत चांदी, मारवाडे आणि नुकरा जातीचे घोडे विशेष आकर्षणाचे केंद्र होते.

फरीदकोट येथे गोविंद सिंह हॉर्स ब्रीड सोसायटीने आयोजित केलेल्या या जत्रेत घोड्यांच्या शोचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच पशू पालकांना उत्तेजन देणे आणि पशूंच्या जातीत सुधार करणे असा या जत्रेच्या आयोजनाचा हेतू होता.

पंजाब सरकारचे राजकीय सल्लागार तथा फरीदकोटचे आमदार कुशलदीप सिंह ढिल्लो यांनी या जत्रेचे आयोजन केले होते. यात देव आणि परमवीर नावाचे घेडे विशेष आकर्षण होते. या घोड्यांच्या मालकांना सलमान खानने कोट्यवधींची ऑफर दिली होती. मात्र, त्याची ही ऑफर या घोड्यांच्या मालकांनी नाकारली. यावेळी देव घोड्याची किंमत पाच कोटींपर्यंत लावली गेली. 

टॅग्स :PunjabपंजाबSalman Khanसलमान खानRajasthanराजस्थान