शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
7
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
8
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
9
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
10
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
11
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
12
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
13
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
14
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
15
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
16
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
17
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
18
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
19
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
20
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता

पंजाबमध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक; ऑपरेशन सिंदूरची माहिती आयएसआय एजंटना पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:39 IST

पंजाब पोलिसांनी आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला तरणतारन येथून अटक केली आहे.

Punjab Spy Arrested: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध देशभरात तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथकांकडून देशभरात कारवाई सुरु असून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातील अभियंता रवी वर्मा, हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता पंजाबमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानला भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर सुरु केलं आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यानंतर भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या गुप्तहेरांविरोधात तपास यंत्रणांकडून मोहिम सुरु करण्यात आली. या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या अनेकांनी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात महत्त्वाची माहिती पुरवल्याचे उघड झालं. अशातच आता ऑपरेश सिंदूरची माहिती पाकिस्तानातील आयएसआय एजंटना पुरवल्याचे समोर आलं आहे.

पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस युनिट आणि तरनतारन पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानी आयएसआय एजंटना पाठवणाऱ्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव गगनदीप सिंग असून तो मोहल्ला रोडुपूर गली नजर सिंग वली, तरनतारन येथील रहिवासी आहे. गगनदीपवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात राहून लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात गगनदीप सिंग हा भारतीय सैन्याच्या कारवाया आणि मोक्याच्या ठिकाणांशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तो ही माहिती शेअर करत होता. गगनदीप पाच वर्षांपासून पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी गोपाल सिंग चावला यांच्या संपर्कात होता. या माध्यमातून त्याची ओळख एका पाकिस्तानी आयएसआय ऑपरेटिव्हशी (पीआयओ) झाली. गगनदीपला ही माहिती पुरवण्यासाठी पैसेही दिले जात होते. हा पैसा पाकिस्तानी एजंटकडून थेट गगनदीपकडे पोहोचवण्यात येत होता.

अटक केल्यानंतर गगनदीपकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे ज्याद्वारे तो आयएसआय एजंटना संवेदनशील माहिती पाठवत होता. त्याच्या फोनमधून २० हून अधिक संशयित आयएसआय नंबरची माहिती मिळाली आहे. या नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि गगनदीपच्या अन्य सहकाऱ्यांना शोधण्यासाठी तपास यंत्रणांकडून तांत्रिक आणि आर्थिक चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPunjabपंजाबPakistanपाकिस्तानISIआयएसआय