शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

Punjab BSF: BSF मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार, 'कटप्पा'ने 4 जवानांना ठार केल्यानंतर स्वतःवर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 15:16 IST

या घटनेनंतर मीडिया कर्मचार्‍यांना अद्याप आवारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. याबाबत BSF अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.

अमृतसर:पंजाबच्या अमृतसर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बीएसएफ जवान एसके सत्तेप्पा उर्फ 'कटप्पा'ने आज सकाळी बीएसएफ मुख्यालयातील मेसमध्ये आपल्या सोबतच्या इतर बीएसएफ जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या धक्कादायक घटनेत 10 जवान जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कटप्पाने स्वतःवरही गोळी झाडली.  अशाप्रकारे या घटनेत आतापर्यंत एकूण 5 जवानांचा मृत्यू झाला आहे. 

यामुळे झाडल्या गोळ्या

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कटप्पा गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली ड्युटी बदलावी यासाठी प्रयत्न करत होता. शनिवारी कटप्पाचा बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी वादही झाला. यानंतर रविवारी सकाळी ड्युटीवर असताना कटप्पाला अचानक राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात बंदुकीतून गोळीबार सुरू केला. बंदुकीचा आवाज ऐकून इतर सैनिक इकडे-तिकडे धावू लागले, तिथे सुमारे 10 जणांना गोळ्या लागल्या. घटनेनंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होताया घटनेनंतर मीडिया कर्मचार्‍यांना अद्याप आवारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. याबाबत अधिकारी अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. घटनेनंतर मृत आणि जखमी जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली जात आहे. बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारीही सुरू केली आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBSFसीमा सुरक्षा दलFiringगोळीबारDeathमृत्यू