शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अबुधाबीहून लग्नासाठी सुट्टी घेऊन आला अन् प्लान रद्द करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाला

By कुणाल गवाणकर | Updated: December 26, 2020 11:17 IST

यूएईहून दोन महिन्यांची सुट्टी घेऊन आलेला तरुण शेतकरी आंदोलनात सहभागी

दिल्ली: मोदी सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवरील भागांत गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूएईहून आलेला एक तरुणदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे हा तरुण लग्न करण्यासाठी दोन महिन्यांची सुट्टी काढून पंजाबमध्ये दाखल झाला. मात्र मोठा भाऊ आणि गावातील बरेचसे शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला जात असल्यानं पाहून त्यानंदेखील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पंजाबला जाऊन मुलगी शोधायची आणि लग्न करायचं या उद्देशानं २९ वर्षी सतनाम सिंगनं अबुधाबी सोडली. जवळपास दोन वर्षे सलग काम केल्यानंतर सतनामला दोन महिन्यांची रजा मिळाली. त्यानंतर तो २९ नोव्हेंबरला जालंधरला पोहोचला. त्यावेळी मोठा भाऊ आणि गावातील शेतकरी सिंघू सीमेवर सरकारविरुद्ध आंदोलन करत असल्याचं त्याला समजलं. सतनाम दोन दिवस आई बाबांसोबत राहिला. त्यानंतर त्यानं दुचाकीवरून एका मित्रासोबत दिल्ली-हरयाणाची सीमा गाठली.लग्न नंतर होऊ शकतं. नोकरी नंतर करता येऊ शकते, असं अबुधाबीत प्लंबर म्हणून काम करणाऱ्या सतनामनं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं. सतनामनं या सुट्टीत लग्न करावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. मात्र सतनाम सध्या आंदोलनात सहभागी झाला आहे. 'मी सुट्टीत लग्न करावं. माझा संसार सुरू व्हावा, अशी माझ्या पालकांची इच्छा आहे. माझी आई आता ७० वर्षांची आहे. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला आहे. तिला नीटसं दिसत नाही. वडिलांचं वयदेखील जास्त असल्यानं त्यांना शेतातील सर्व कामं जमत नाही,' अशा शब्दांत सतनामनं घरातील परिस्थिती सांगितली.सतनामचे पालक घरी आहेत. त्यांना सोडून सतनाम आंदोलनासाठी सिंघू सीमेवर आला आहे. मात्र त्यांनी सतनामला रोखलं नाही, असं सतनामचा मित्र सुखा सिंहनं सांगितलं. अजून किती दिवस आंदोलन करणार, असा प्रश्न विचारला असता, जोपर्यंत लढा जिंकत नाही तोपर्यंत, असं उत्तर सतनामनं दिलं. 'मी आधी शेतकरी आहे. सुरुवातीला शेतातच काम करायचो. त्यानंतर नोकरीसाठी यूएईला गेलो. मला आधी माझं शेत वाचवायचं आहे,' असं सतनाम म्हणाला. 

टॅग्स :marriageलग्नFarmerशेतकरी