पंजाब, हरियाणात गव्हाच्या पिकात २० टक्क्यांची घट
By Admin | Updated: March 3, 2015 00:38 IST2015-03-03T00:38:31+5:302015-03-03T00:38:31+5:30
उत्तर भारतात झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पंजाब व हरियाणात वेळेवर पेरणी झालेल्या गव्हाच्या पिकात १० ते २० टक्क्यांची घट होऊ शकते.

पंजाब, हरियाणात गव्हाच्या पिकात २० टक्क्यांची घट
चंदीगड : उत्तर भारतात झालेला अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पंजाब व हरियाणात वेळेवर पेरणी झालेल्या गव्हाच्या पिकात १० ते २० टक्क्यांची घट होऊ शकते. पाऊस आणि वाऱ्यामुळे १० ते २० टक्के पीक आडवे झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
रबी हंगामात पंजाबमध्ये जवळपास ३५ लाख आणि हरियाणात २५ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. ही दोन्ही राज्ये गव्हाची प्रमुख उत्पादक राज्ये आहेत.
पंजाब आणि हरियाणात सोमवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पंजाबमध्ये सरासरी पाऊस ३४, तर रोपोरमध्ये सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस झाला.