शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या 'त्या' आंदोलनातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार देणार 2 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 13:16 IST

चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे.

ठळक मुद्दे26 जानेवारी 2021 रोजी केंद्र सरकारच्या 3 शेती कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाद्वारे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.

नवी दिल्ली - पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्यावर्षी 26 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. या आंदोलनात पोलिसांनी एकूण 83 समर्थकांना अटक केली होती. आता, या 83 जणांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग यांनी ट्विट करुन सांगितले आहे. 

चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे. आम्ही 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 83 आंदोलनकर्त्यांना पंजाब सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत करण्यात येईल. 26 जानेवारी 2021 रोजी केंद्र सरकारच्या 3 शेती कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाद्वारे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या ट्रॅक्टर रॅलीला त्यावेळी हिंसक वळण लागले होते, तेव्हा आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडून सुरक्षा रक्षकांवर हल्लाबोल करत लाल किल्ल्यावर किसान मोर्चा आंदोलनाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, लाल किल्ला परिसरात शेतकरी आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांमध्ये खडाजंगी झाली, पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 200 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी, 83 शेतकरी आंदोलकांनी ही मदत देण्यात येणार आहे.   

दरम्यान, केंद्र सरकराच्या 3 कृषी कायद्यांविरुद्धच्या शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्वीनिमित्त 29 नोव्हेंबरपासून संसद परिसरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात 26 नोव्हेंबरपासून संयुक्त किसान मोर्चाने आंदोनलास सुरुवात केली होती.   

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्री