शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 09:49 IST

Gangster Jaggu Bhagwanpuria Mother Murder: पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरियाची आई हरजीत कौर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

पंजाबमधील गँगस्टर जग्गू भगवानपुरियाची आई हरजीत कौर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत हरजीत कौर यांच्या चालकाही मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा बटाला येथे हा धक्कादायक प्रकार घडला.  याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास कादियन रोडवरील एका बेकरीबाहेर एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ एसयूव्ही थांबते. तितक्यात पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोर स्कॉर्पिओमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या लोकांवर गोळीबार करतात आणि घटनास्थळावरून पळून जातात.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हरजीत कौर यांना तातडीने अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेत हरजीत कौर यांचा चालक  करणवीर सिंग याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला रात्री १०:४५ च्या सुमारास गोळीबार झाल्याचा फोन आला आणि आम्ही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

हरजीत कौर स्थानिक राजकारणात सक्रिय म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी २०२२ मध्ये त्यांचा मुलगा भगवानपुरियाला तुरुंगात बुलेटप्रूफ जॅकेट देण्याची मागणी केली होती, त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. जग्गू भगवानपुरिया हा पंजाबमधील कुख्यात गुन्हेगार असून सध्या तो आसामच्या सिलचर तुरुंगात आहे. त्याच्यावर हत्या, ड्रग्ज तस्करी आणि खंडणी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला भटिंडा मध्यवर्ती तुरुंगातून अटक केली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आसामला हलवण्यात आले.

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीShootingगोळीबार