शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:08 IST

AAP Harpal Singh Cheema And BJP : अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे.

पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema) यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबमध्येभाजपाने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजपा आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरपाल सिंग चीमा म्हणाले. अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे.

आप पंजाबने याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं. "सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजपा हे विसरत आहे की आम आदमी पक्षाचा एकही आमदार विक्रीसाठी नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपाची कारवाई अपयशी ठरेल" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'आप'पासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर

पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी मंगळवारी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केला की, 'आप'चे आमदार विकत घेऊन पंजाबमधील 'आप' सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ऑपरेशन लोटससाठी भाजपा केंद्रीय एजन्सी तसेच पैसा वापरत आहे. अर्थमंत्री चीमा म्हणाले की, भाजपाने आमच्या आमदारांना 'आप'पासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर भाजपाने या आमदारांना मोठ्या पदाचे आमिषही दिले आहे. यासोबतच तुम्हाला आणखी आमदार मिळाल्यास 75 कोटी रुपये दिले जातील, असे सांगितले.

'आप'च्या 10 आमदारांशी साधला संपर्क  भाजपावर आरोप करताना हरपाल सिंग चीमा म्हणाले की, भाजपा नेते आप आमदारांना सांगत आहेत की सरकार पाडण्यासाठी त्यांना फक्त 35 आमदारांची गरज आहे. काँग्रेसचे आमदार त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे बोलत आहेत. चीमा म्हणाले की भाजपाने पंजाबमधील सात ते 10 आप आमदारांशी संपर्क साधला आहे, परंतु चीमा यांनी या आमदारांची नावे घेतली नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPunjabपंजाब