शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

डाव उधळला! पंजाबमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; ड्रोनमधून फेकली स्फोटकं, BSF कडून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:18 IST

Punjab Explosives Dropped Through Drone Pakistan : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले.

नवी दिल्ली - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती या दिवसागणिक वाढत आहेत. अशीच एक घटना आता पंजाबच्या अमृतसरमध्ये घडली आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले. बॉक्स फेकल्याचा संशय येताच बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. गोळीबारानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. शोध मोहीम सुरू असताना काही स्फोटकं देखील आढळून आली आहे. 

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तेथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान, पाकिस्तानने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना अमृतसर, पंजाबमधील अजनाला तहसीलमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले. त्यानंतर सतर्क जवानांनी सीमेवरून उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला आणि दहशतवादी प्रयत्न हाणून पाडला. 

ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काहीतरी फेकल्याचा बीएसएफ जवानांना संशय आला.मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या पंजग्राहियन बीओपीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला.यानंतर सुरक्षेत तैनात जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. 

बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला

बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवानांनी सीमेवर उडणाऱ्या ड्रोनवर गोळीबार केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही वस्तू फेकल्याचा संशय असून, दोन ठिकाणी स्फोटकं सापडली. आता मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानातून स्फोटक पदार्थ, शस्त्रे पाठवले जाण्याची भीती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPunjabपंजाबPakistanपाकिस्तान