शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये 'आप' सरकार स्थापन झाल्यास हरपाल सिंग चीमा यांना मिळू शकते उपमुख्यमंत्रीपद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:34 IST

Harpal Singh Cheema : मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पंजाबमध्ये 'आपचे सरकार स्थापन झाले तर हरपाल सिंग चीमा यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते.

चंदीगड : पंजाबमधील सर्व जागांचे कल आले आहेत. यामध्ये आम आदमी पार्टीला (आप) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यासह अनेक दिग्गज आपापल्या जागेवरून पिछाडीवर आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema) हे सध्या चर्चेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पंजाबमध्ये 'आपचे सरकार स्थापन झाले तर हरपाल सिंग चीमा यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. निकाल जाहीर होण्यापूर्वी हरपाल सिंग चीमा म्हणाले होते की 'आप' राज्यात सरकार स्थापन करणार आहे आणि एक्झिट पोलवर शंका घेण्याचे कारण नाही. दरम्यान, सध्या पंजाबमध्ये 'आप'ला स्पष्ट बहुमत दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांच्यासह उपमुख्यमंत्री पदासाठी हरपाल सिंग चीमा यांचे नाव चर्चेत आहे.   

दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हरपाल सिंग चीमा यांनी अकाली दलाचे गुलजार सिंग मूनक आणि काँग्रेस नेते अजाइब सिंग रोतलान यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. आता ते पुन्हा त्याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत. हरपाल सिंग चीमा हे पेशाने वकील आहेत. निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी, हरपाल सिंग चीमा यांनी पंजाबमध्ये 'आप'ला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते 'आप'चे नेते हरपाल सिंह चीमा हे पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि संगरूर जिल्ह्यातील दिरबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. चीमा 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आपमध्ये सामील झाले होते. त्यानंतर 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिरबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. प्रसिद्ध पंजाबी कबड्डीपटू गुलजार सिंग मूनक यांच्या विरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मुनक यांनी शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपPunjabपंजाबPoliticsराजकारण