शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

Capt Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव, आपच्या उमेदवाराने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:22 IST

Capt Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.

अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Election Result 2022) सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टी (AAP) मोठा विजय मिळवताना दिसत आहे. आम आदमी पार्टीची जवळपास 90 जागांवर आघाडी आहे. तर सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे. काँग्रेस आतापर्यंत केवळ 18 जागांवर आघाडीवर आहे. तर अकाली दल 10  जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर भाजपा मात्र निष्प्रभ दिसून येत आहे. दरम्यान, पटियाला येथून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या जागेवरून आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंह कोहली विजयी झाले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांनी पटियाला अर्बन सीटवरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जवळपास 14,000 मतांनी पराभव केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे 4 वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर पक्षात अंतर्गत कलह वाढल्यामुळे काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि या निवडणुकीत भाजपाशी युती केली होती. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. परंतु या क्षणी ते स्वतःची जागा देखील वाचवू शकले नाहीत.

काँग्रेसमधून बाहेर पडण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची गणना काँग्रेसच्या सर्वात मजबूत प्रादेशिक नेत्यांमध्ये केली जात होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने पंजाबमध्ये 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या आणि तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती. तेव्हा काँग्रेसने फक्त शिरोमणी अकाली दल किंवा भाजपाचाच पराभव केला नव्हता तर आम आदमी पार्टीची स्वप्नेही चिरडून टाकली होती.

दरम्यान,  कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियालाचे दिवंगत महाराजा यादविंदर सिंग यांचे पुत्र आहेत. लॉरेन्स स्कूल सनावर आणि देहरादूनच्या दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जुलै 1959 मध्ये NDA अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. डिसेंबर 1963 मध्ये तेथून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर 1963 मध्ये ते भारतीय लष्करात सामील झाले होते. ते त्याच दुसऱ्या बटालियन शीख रेजिमेंटमध्ये तैनात होते. 

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपPunjabपंजाबcongressकाँग्रेस