शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

"सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:33 IST

Punjab Election 2022 Charanjit Singh Channi And Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांनी सणसणीत  टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सणसणीत  टोला लगावला आहे.

पंजाब निवडणुकांसाठी अमृतसरमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलताना भगवंत मान यांनी काँग्रेसचा उल्लेख सर्कस असा केला होता. "काँग्रेस पक्ष आता पंजाबमध्ये एक सर्कस बनला आहे. चन्नीसाहेबांचा ते लढत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. आप त्यांचा पराभव करेल. ते जर आमदारच नसतील, तर ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत" असं म्हटलं होतं. त्याला टीकेला आता चरणजीत सिंग चन्नी यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. "ही जर आमची सर्कस असेल, तर तिथे माकडाची जागा रिकामी आहे. त्यासाठी त्यांचं स्वागत आहे. त्यांना दाखल व्हायचं असेल तरी ते होऊ शकतात" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्यावेळी अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यात ते जखमी झाले होते. कारचा सनरूफ उघडून भगवंत मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला होता.

दरम्यान, पंजाबमधील सर्व जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने लोकांची मते मागवून त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संगरूर येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपcongressकाँग्रेसPoliticsराजकारण