शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: पंजाबच्या विधानसभेला महिलांचे कायमच वावडे; पक्षांची प्रतिगामी मानसिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 10:46 IST

महाराष्ट्र विधानसभा ही पंजाबपेक्षा अडीचपट मोठी आहे, हे खरे असले तरी पंजाबमध्ये महिलांना संधी देण्यात राजकीय पक्ष मागे असल्याचेच चित्र दिसते.

विश्वास पाटील

अमृतसर : पंजाब विधानसभेला महिलांचे वावडे आहे की काय, अशी शंका यावी इतके कमी प्रतिनिधित्व आजपर्यंत या प्रदेशाने महिलांना दिले आहे. राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देण्यात मागे असले तरी महिला मात्र तुम्ही देत नसाल तर राहू दे; परंतु मी लढणार, अशी भूमिका घेऊन मैदानात उतरत आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या महिलांचे प्रमाण मात्र लक्षणीय आहे.महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या २४ महिला आमदार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा ही पंजाबपेक्षा अडीचपट मोठी आहे, हे खरे असले तरी पंजाबमध्ये महिलांना संधी देण्यात राजकीय पक्ष मागे असल्याचेच चित्र दिसते. ही दोन्ही राज्ये अनेक बाबतीत पुढारलेली म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्राने अजून महिलेला मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेली नाही. पंजाबात मात्र काँग्रेसच्या राजिंदर कौर भट्टल या १९९७ मध्ये ८२ दिवसांच्या का असेनात; परंतु मुख्यमंत्री झाल्या होत्या. या राज्यात महिलांचे ४८ टक्के मतदान आहे. यापूर्वी १९६९ च्या निवडणुकीत एकही महिला आमदार म्हणून निवडून आलेली नव्हती.  विधानसभेच्या १९६० पासून २०१७ पर्यंत ११७ सदस्यांच्या सभागृहात सर्वाधिक १४ महिला २०१२ मध्ये निवडून आल्या होत्या. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण १,३०४ उमेदवारांमध्ये ९३ महिला उमेदवार आहेत. त्यापैकी ३५ महिलांना विविध पक्षांनी संधी दिली असून, उर्वरित बहुतांशी अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

पक्ष संधी द्यायला तयार नाहीतपंजाबमधील महिलांना राजकारणात रस आहे. निवडणूकही लढवायची आहे; परंतु राजकीय पक्ष संधी द्यायला तयार नाहीत. निवडून येण्याची क्षमता हे एक त्यामागील महत्त्वाचे कारण असले तरी जोपर्यंत संधी मिळणार नाही तोपर्यंत ही क्षमताही वाढणार नाही. या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. नव्या सभागृहात पंजाबी लोक किती महिलांना आमदार करतात, हीच खरी उत्सुकता आहे.

सरंजामशाही मनोवृत्तीच कारणीभूतपंजाबमध्ये महिला सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहेत. त्या ट्रॅक्टर चालवितात. कृषी बिलाच्या विरोधातील आंदोलनातही त्या पुढे होत्या; परंतु निवडणुकीत राजकीय पक्ष महिलांना संधी देत नाहीत, यामागे या प्रदेशाची सरंजामशाही मनोवृत्तीच कारणीभूत आहे. -जुपिंदरजित सिंग,ज्येष्ठ पत्रकार, चंदीगड 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२