शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:27 IST

Old Pension Scheme : सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे.

चंडीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने (Aam Aadmi Party Government) कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे.

जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी (Old Pension Scheme) चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. आगामी काळात पंजाब सरकार जुनी पेन्शन रिस्टोरेशनवर (Old Pension Restoration)  काम करेल. या संदर्भात पंजाबच्या मुख्य सचिवांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार जुनी पेन्शन पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. 

यासंदर्भात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट सुद्धा केले आहे. ते म्हणाले की, पंजाब सरकारमध्ये कार्यरत कर्मचारी जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, पंजाबचे भगवंत मान यांनी गेल्या महिन्यात पंजाबमध्ये एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू केला होता. अनेक वर्षांचा जुना एकापेक्षा जास्त पेन्शन देणारा कायदा रद्द करण्यात आला. पंजाबमध्ये मान सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अधिसूचना जारी केली जाईल.

योजना पूर्ववत व्हावी, अशी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा - अरविंद केजरीवाल दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की, "खूप छान! एक उत्तम निर्णय. जुनी पेन्शन योजना पूर्ववत व्हावी, अशी देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे."

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतनBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाब