पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांना बरे वाटत नव्हते. डॉक्टरांकडून औषधे घेऊन ते घरीच आराम करत होते. परंतू, त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. यामुळे त्यांना डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले होते.
पुरामुळे पंजाबचे सर्व जिल्हे पाण्याखाली आहेत. प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरे वाहून गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून मान हे पूर परिस्थितीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त होते. यानंतर ते आजारी पडले होते.