शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवेत एकाही दिवसाचा खंड पडू देणार नाही- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 10:15 IST

हजारो नागरिकांच्या साक्षीने झाला शपथविधी

शहीद भगतसिंग नगर : आम आदमी पक्षाचे (आप)चे नेते भगवंत मान यांनी बुुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जंगी सोहळ्यात पंजाबी भाषेत शपथ घेतली. शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलान या मूळ गावी झालेल्या या समारंभाला आपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.  मी एकही दिवस वाया न घालविता जनतेच्या हिताचे निर्णय घेईन. राज्यामधील बेकारी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी अथक प्रयत्न करेन, असे आश्वासन भगवंत मान यांनी जनतेला दिले.

पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आपने काँग्रेस व अन्य पक्षांचा दणदणीत पराभव केला होता. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्यात मान म्हणाले की, मी माझ्या कामाला लगेचच सुरुवात करणार आहे. उत्तम काम करण्यासाठी आधीच ७० वर्षे उशीर झाला आहे. या शपथविधीनंतर भगवंत मान यांनी चंदीगड येथे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली व कामाला प्रारंभ केला.

माजी स्टँड-अप कॉमेडियन असलेले भगवंत मान यांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. बुधवारी फक्त मान यांचाच शपथविधी पार पडला. त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार असल्याचे आपच्या सूत्रांनी सांगितले. मान यांच्या शपथविधीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काही मंत्री व पंजाबमधील आपचे सर्व आमदार उपस्थित होते. (वृत्तसंस्था)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

पंजाबमध्ये आपने ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आहेत. दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये या पक्षाची सत्ता आली आहे. भगवंत मान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAAPआप