शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:36 IST

राजभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

- बलवंत तक्षक चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळात १० मंत्र्यांचा समावेश केला. राजभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर या एकमेव महिला मंत्री आहेत. मंत्रिमंडळात ज्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यात आपचे आमदार हरपाल सिंग चीमा, हरज्योत सिंग बैस, गुरमीत सिंग हेयर, डॉ. विजय सिंगला, बृह्म शंकर जिंपा, हरभजन सिंग ईटीओ, लालचंद कटारुचक्क, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर आणि डॉ. बलजीत कौर यांचा समावेश आहे. यातील आठ मंत्री प्रथमच निवडून आले आहेत.  मुख्यमंत्री मान यांच्यासह चार जट्ट शीख, तीन हिंदू आणि चार अनुसूचित जातीचे सदस्य आहेत. हरपाल सिंग चीमा हे आपचा अनुसूचित जातीचा सर्वांत मोठा चेहरा आहेत. तर, बृह्म शंकर जिंपा हे हिंदू चेहरा आहेत. हरज्योत सिंग बैंस (३१) हे सर्वांत कमी वयाचे आहेत. तर, कुलदीप धालीवाल सर्वांत ज्येष्ठ (६०) आहेत. या सोहळ्याला मान यांचे चिरंजीव दिलशान आणि सीरत कौर हेही उपस्थित होते. मंत्रिमंडळात मालवा क्षेत्राला झुकते माप देण्यात आले आहे. बृह्म शंकर जिंपा यांची संपत्ती सर्वाधिक ८ कोटी तर, कटारुचक्क यांची संपत्ती सर्वांत कमी ६ लाख इतकी आहे.

कुलतार सिंग संधवा विधानसभेचे अध्यक्ष कोटकपुरा मतदारसंघातील आमदार कुलतार सिंग संधवा हे विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. ते आपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. ऑटोमोबाइल इंजिनीअर संधवा हे माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झैल सिंग यांच्या लहान भावाचे नातू आहेत. आपचे प्रवक्ते म्हणून काँग्रेस सरकारला घेरण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे.

२५ हजार नोकऱ्यांना मंजुरीपंजाब मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २५ हजार सरकारी नोकऱ्यांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी कार्यालये आणि महामंडळ यातील २५ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. पंजाबमध्ये सध्या एक लाख पदे रिक्त आहेत, तर ३६ हजार कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपने निवडणुकीत प्रत्येक घराला ३०० युनिट मोफत वीज आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना एक हजार रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणा केली होती. वाळूमाफिया, केबलमाफिया यांची साखळी समाप्त करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, हे आश्वासने पूर्ण करण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील.

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मान