शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Assembly Election Result: चरणजित सिंग यांना चरणजित सिंग यांचा धक्का; पंजाबमध्ये आपचा काँग्रेसला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:33 IST

Punjab Assembly Election Result: पंजाबमध्ये लक्षवेधी लढतीत काँग्रेसला आपचा दणका

चंदिगढ: पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. ११७ मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप ९० जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत. 

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पिछाडीवर आहेत. बरनाला जिल्ह्यातील भदौर विधानसभा मतदारसंघात चरणजीत सिंग चन्नी मागे आहेत. या मतदारसंघात आपचे उमेदवार लाभ सिंग उग्गोके आघाडीवर आहेत. पंजाबचे कृषिमंत्री रणदीप सिंगदेखील पिछाडीवर आहेत.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी चमकौर साहेब मतदारसंघातही पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे इथे त्यांचा मुकाबला आपचे नेते चरणजीत सिंग यांच्याशी होता. दोन्ही उमेदवारांची नावं सारखी आहेत. मतदारांनी आपच्या चरणजीत सिंग यांना पसंती दिल्याचं दिसत आहे. 

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी २०१७ मध्ये चमकौर साहेब मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना आपनं जोरदार धक्का दिला आहे. चन्नी दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. थोड्याच वेळात ते राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२congressकाँग्रेसAAPआप