शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:50 IST

आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले

नवी दिल्ली - देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल वाजलं असून लवकरच निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या 5 राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, पंजाबमध्येही 14 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणुका होत आहेत. 

आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले. कोरोना आणि लसीकरण यासंदर्भातही माहिती दिली. प्रत्येक मतदार केंद्रावर मास्क आणि सॅनिटायजर्सची सोय असणार आहे. तर, मतदानाची वेळ एक तास वाढविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत असून 10 फेब्रवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तर, पंजाब आणि गोव्यात एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. त्यानुसार, पंजाब आणि गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, 10 मार्चला मजमोजणी होणार आहे. 

पाचही राज्यातील उमेदवारांसाठी 14 जानेवारी पासून नामनिर्देशित अर्ज उपलब्ध असणार आहेत. तर, नामनिर्देशित अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी आहे. 24 जानेवारी रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. तर, 27 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज माघारी घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 10 फेब्रुवारी रोजी सुरुवात होणार आहे.  

म्हणून पंजाबची निवडणूक चर्चेत राहणार

पंजाबमध्ये नुकतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत झालेली गडबड, माजी मुख्यंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी काँग्रेसला केलेला रामराम आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमारेषेवर तब्बल वर्षभर चाललेलं आंदोलन, या घटनांमुले पंजाबच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असून चरणजीतसिंग हे मुख्यमंत्री आहेत. तर, आम आदमी पक्षानेही चंढीगड महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवले. त्यामुळे, पंजाबमध्ये आप आणि भाजपच्या प्रचारयंत्रणेकडेही देशाचे लक्ष लागून असणार आहे.   

टॅग्स :PunjabपंजाबElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcorona virusकोरोना वायरस बातम्या