शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्..."; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 09:17 IST

Rakesh Tikait And Modi Government : योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपाला शेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी मेरठमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपालाशेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असं आवाहन केलं आहे. योगेंद्र यादव यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "क्रांतीचं ठिकाण असलेल्या मेरठमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाबाबत हन्नान मोल्ला आणि राकेश टिकैत यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यात एकच संदेश आहे की शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या" असं म्हटलं आहे. 

राकेश टिकैत यांनी "पश्चिम उत्तर प्रदेशला विकासाची चर्चा करायची आहे. हिंदू, मुस्लीम, जिन्ना, धर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना मतांचं नुकसान होईल. मुझफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचं मैदान (स्टेडियम) नाही, देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचं नावही घेत नाहीत. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलना दरम्यान जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हणणं टाळलं आहे. त्यांच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत" असं आवाहन टिकैत यांनी केलं आहे. 

"भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत"

संयुक्त किसान मोर्चाने याआधी 4 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नागरिकांना भाजपाला शिक्षा देण्याचं आवाहन केलं होतं. भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना शिक्षा द्यावी, असं म्हटलं होतं. शेतीमालाला हमीभावावर समिती स्थापन करणे आणि शेतकऱ्यांविरोधातील प्रकरणे मागे घेण्यासह अनेक मागण्या अपूर्ण असल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीपासून मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी मतदान होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"कोरोनाच्या संकटात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडलं"

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडल्याचा गंभीर आरोपही केला आणि काँग्रेस असं कधीच करणार नाही, असं देखील म्हणाले आहेत. तसेच मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा त्यांचा पक्ष शेतकर्‍यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीBJPभाजपाrakesh tikaitराकेश टिकैतYogendra Yadavयोगेंद्र यादव