शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

गोहे बुद्रुक परिसरात टाकला पुण्याचा कचरा

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पुणे महापालिकेचा प्रकार : कचरा न उचलल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

पुणे महापालिकेचा प्रकार : कचरा न उचलल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये शनिवारी (दि. १४) पहाटे पुणे महापालिकेच्या सुमारे २५ गाड्यांनी कचरा आणून टाकला़ या कचर्‍यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे येथील पर्यावरणाला, जनावरांना धोका पोहोचणार आहे़ हा कचरा महापालिकेने तत्काळ उचलून घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महापालिकेबाहेर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे यांनी दिला आहे़
गोहे बुद्रुकची उभेवाडी उंच डोंगरावर वसलेली छोटीशी वस्ती आहे़ पुण्यापासून १०० किलोमीटर अंतर आहे़ या ठिकाणी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास सलग २५ ते ३० गाड्या आल्या़ येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाड्यांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता प्लॅस्टिक व घाणीने भरलेले ढीग त्यांना दिसले़
ग्रामस्थांनी चौकशी केली असता, शेतीसाठी खत म्हणून महापालिका कचरा देते. गोहे येथे राहणार्‍या व पुणे महापालिकेत कामाला असणार्‍या मोघाजी उभे यांनी खतासाठी हा कचरा टाकायला लावला आहे़ त्यांनी दाखविलेल्या जागेनुसार पुणे महापालिकेच्या गाड्यांनी येथे कचरा खाली केला़ मोघाजी उभे महानगरपालिकेत सॅनेटरी इन्स्पेक्टर आहेत. दोन दिवसांपूर्वी महापालिकेची गाडी येऊन पाहणी करून गेली होती,असे ग्रामस्थ सीताराम जोशी, रामचंद्र गेंगजे, वामन जोशी, इंदूबाई गेंगजे, किसन गेंगजे, सीताराम गंेगजे, रमेश गेंगजे, दत्तात्रय गेंगजे यांनी सांगितले़
ग्रामपंचायतची परवानगी न घेता कोणालाही न विचारता हा कचरा पुणे महापालिकेने टाकला आहे़ हा कचरा पुणे महापालिकेने घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महापालिकेबाहेर आणून टाकला जाईल. तसेच, पुन्हा गाड्या येऊ नयेत यासाठी येथे पोहोचणार्‍या रस्त्याला रात्री दगडी लावून कचरा गाड्या अडवणार असल्याचे उपसभापती सुभाष तळपे यांनी सांगितले़
प्लॅस्टिकयुक्त कचर्‍यातून खताची निर्मिती कशी होईल, हे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी येऊन दाखवावे़ हे प्लॅस्टिक जनावरांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतील़ हा कचरा रानात पसरेल, प्लॅस्टिकमुळे झाडे उगवणार नाहीत, पर्यावरणाचा र्‍हास होईल़ शहरीकरणामध्ये आमच्या आदिवासींचा बळी घेऊ नका, काबडकष्ट करून आदिवासी शेतकरी जगतात. मानवनिर्मित आपत्ती आमच्यावर नको, या ठिकाणी पुण्याचा कचरा टाकल्यास येथून गाड्या जाऊ देणार नाही, असेे सीताराम जोशी यांनी सांगितले़
कोट
या घटनेबाबत पुणे महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून कचरा उचलण्यास सांगितले आहे. हा कचरा उद्या उचलण्यात येणार आहे. गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या कृतीमुळे ग्रामस्थांमध्येही संताप पसरला आहे़ पुणे महापालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल, तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महापालिकेने त्वरित घेऊन जावा व यापुढे महापालिकेने आदिवासी प˜्यात कुठेही कचरा टाकल्यास आंदोलन करण्यात येईल.
दिलीप वळसे-पाटील,
आमदार, आंबेगाव तालुका.
कोट
शेतकर्‍याच्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी ओला कचरा टाकला आहे. ओल्या कचर्‍याऐवजी प्लॅस्टिकयुक्त कचरा टाकला असेल, तर तो परत उचलण्यात येईल.
सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त, कचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका

फोटो १ : गोहे बुद्रुक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पाहताना उपसभापती सुभाष तळपे व ग्रामस्थ.
फोटो २: गोहे बुद्रुक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पहाताना उपसभपती सुभाष तळपे, सीताराम जोशी व ग्रामस्थ.
फोटो ३ : गोहे बुद्रुक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा
फोटो ४ : गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये डांेगराच्या पठारावर पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २५ गाड्यांनी टाकलेला कचरा
छाया -निलेष काण्णव