पुणे जिल्हा शिक्षण मंडळ

By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:16+5:302015-06-06T00:11:16+5:30

Pune District Board of Education | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ

>सोळा उच्च,कनिष्ठ महाविद्यालयांची शंभर टक्के निकालात बाजी

पुणे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सोळा उच्च व
कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालात बाजी मारली आहे.विज्ञान व
वाणिज्य शाखेत प्रत्येकी सहा, कला आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागात
प्रत्येकी दोन शाखांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
संस्थेच्या वेगवेगळे अभ्यासक्रम असलेल्या तीस शाखांतील ९३६३ विद्यार्थी
परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८७८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण ९३.८४ टक्के आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेत १५
कनिष्ठ महाविद्यालयातून ३०४३ पैकी २८८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या
शाखेचा संस्थेचा निकाल९४.८१ टक्के आहे. या विभागात लोहगाव, सूपे,
न्हावरे, वाघोली, कळस, सविंदणे या सहा उच्च माध्यमिक शाखांचे सर्व
विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर सात विद्यालयांचे निकाल ९० टक्केच्या पुढे
आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल ९५.९ टक्के लागला आहे. या विभागात सोळा शाळांमधील
३१६० पैकी ३००५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सुपे, पौड, वाघोली,
कामशेत, वेल्हा, च?्होली या विद्यालयांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
नसरापूर, खानापूर, मुंढवा, मोशी या शाळांतील प्रत्येकी केवळ क विद्यार्थी
अनुत्तीर्ण झाला असून इतर सात शांखांचे निकाल ९५ टक्केच्या पुढे आहे.
कला शाखेत २५ शाखांतील १६७३ पैकी १४८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या
विभागात संस्थेचा कूण निकाल ८८.९४ टक्के लागला आहे. काटी आणि कळस शाळांचे
निकाल शंभर टक्के लागले असून कामशेत, नसरापूर, सांगवी, सुपे, वेल्हा,
पौड, मुंढवा, च-होली, मोशी या नऊ शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी
अनुत्तीर्ण झाला आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल ९४.६९ टक्के लागला आहे. या विभागात
संस्थेच्या २० शाखांतील १४८७ पैकी १४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पौड
आणि मुंढवा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून नसरापूर, कामशेत,
पिरंगुट, सासवड या शाळांतील प्रत्येकी केवळ क विद्यार्थी अनुत्तीर्ण
झाला.इतर सात शाखांचे निकाल९५ टक्केच्या पुढे आहे.

Web Title: Pune District Board of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.