शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

पुणे विमानतळाचे होणार खासगीकरण, पंतप्रधानांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 5:10 AM

नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग व अर्थमंत्रालयाला दिले आहेत

हरीश गुप्तानवी दिल्ली : नफ्यात असणाऱ्या १५ पैकी ८ विमानतळांचे खासगीकरण वेगाने हालचाली करण्याचे निर्देश पंतप्रधान कार्यालयाने नीती आयोग व अर्थमंत्रालयाला दिले आहेत. त्यात पुणे विमानतळाचाही समावेश आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या विमानतळांचे चालू आर्थिक वर्षात खासगीकरण केले जाईल. मोदी सरकारकडून एअर इंडिया व राज्यांच्या मालकीच्या हॉटेल्सची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात दिल्लीतील हॉटेल अशोकचा समावेश आहे. हॉटेल व विमानतळ देखभालीतून लाभ मिळत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पुण्याशिवाय लखनौ, जयपूर, चेन्नई, कोलकाता, कोची, अहमदाबाद व गुवाहाटी या विमानतळांचेही खासगीकरण होणार आहे. ही सर्व विमानतळे नफ्यात आहेत. त्यामुळे सरकार येथून मोठा महसूल मिळू शकतो. पीएमओने अर्थमंत्रालय व नीति आयोगाला या खासगीकरणासाठी विशेष यंत्रणा करण्यास सांगितले आहे. बोली लावण्याची पद्धत पूर्वीच्या यूपीए सरकारने दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळांसाठी वापरलेल्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल.या आधी मोदी सरकारने विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या विमानतळांवरील व्यवस्थापनाची कंत्राटे खासगी क्षेत्रात देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या निर्णयानुसार जयपूर आणि अहमदाबाद विमानतळांसाठी निविदा मागविण्यात आल्यावर त्या अपयशी ठरल्या व या प्रस्तावांना प्रतिसाद मिळाला नाही. आता विमानतळांचे संपूर्ण नियंत्रण खासगी क्षेत्राकडे देण्याची शक्यता अजमावून बघण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) परवानगी दिली आहे. विमानतळे ३० वर्षांसाठी बाहेरच्या कंत्राटदारांसाठी दिली जाण्याची शक्यता आहे आणि दर आगाऊच ठरवले जातील.यूपीए सरकारने दिल्ली व मुंबई विमानतळांचे खासगीकरण विमानतळाला जो सकल महसूल मिळेल, त्यातील सर्वात जास्त हिस्सा विमानतळ प्राधिकरणला देण्याचे ठरले होते. या व्यवस्थेत विकसकाला गुंतवणुकीवर परताव्याचे प्रमाण कमी झाले व त्याची भरपाई करून घेण्यासाठी दरात वाढ होईल. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळांचे कामकाज आणि देखभालीसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया औपचारिक निविदा जीव्हीके ग्रुप या एकमेव कंपनीने सादर केल्यामुळे आता खुंटली आहे. त्यामुळे मोदी सरकारला खासगीकरणाच्या मॉडेलकडे लक्ष देणे भाग पडू शकते.