शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 15:46 IST

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे आक्रमक

मुंबई: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं दणका दिला आहे. पाकिस्तानी गायकांची गाणी त्वरित यूट्युबवरुन हटवा, असा इशारा मनसेनं म्युझिक कंपन्यांना दिला आहे. यानंतर टी सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली. पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवा, असा सज्जड दम मनसेनं दिला होता. याशिवाय पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं बंद करा, असा इशारादेखील दिला. 'आम्ही टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टिप्स म्युझिक यासारख्या कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम करु नका, असं सांगितलं आहे. त्यामुळे या कंपन्यांनी त्वरित पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं थांबवावं. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू,' असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला. आम्ही दिलेल्या इशाऱ्यानंतर टी सीरिजनं त्यांच्या यूट्युब चॅनेलवरुन पाकिस्तानी गायकांची गाणी हटवल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीच भूषण कुमार यांच्या टी सीरिजनं वेगवेगळ्या गाण्यांसाठी राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांच्यासोबत करार केले होते. मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं लगेच पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली. याआधी 2016 साली उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळीही मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीMNSमनसेPakistanपाकिस्तान