शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात घुसखोरी करणारे जिवंत राहणार नाहीत; भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 12:35 IST

Pulwama Terror Attack : भारतीय लष्कराने मंगळवारी (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे.

ठळक मुद्देअतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा!, भारतीय लष्कराचं काश्मीरमधील पालकांना आवाहनकाश्मीरमध्ये घुसखोली कराल तर जिवंत राहणार नाही; भारतीय सैन्याचा दहशतवाद्यांना इशारा

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने मंगळवारी (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे. ''पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांचा 100 तासांच्या आतमध्ये खात्मा केला. काश्मीर खोऱ्यात किती अब्दुल रशीद गाझी आले आणि गेले. कोणत्याही दहशतवाद्याने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यास त्याला जिवंत सोडणार नाही'', असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.  तसंच या हल्ल्यामागे ISIचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असाही मोठा खुलासा भारतीय लष्कारने यावेळेस केला.

'...तर कोणताही दहशतवादी जिवंत राहणार नाही' 

काश्मीर पोलीसचे आयजी एसपी पाणि यांनी सांगितले की, 2018मध्ये जैश-ए-मोहम्मदचे 56 दहशतवादी मारले गेले. यावर्षी आतापर्यंत एकूण 31 दहतशवादी ठार करण्यात आले, यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 12 दहशतवाद्यांचा समावेश आहे.  

लेफ्टनंट जनरल ढिल्लन यांनी म्हटले की, 'किती गाझी आले आणि किती गेले, काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला आम्ही ठार करणारच. एकही दहशतवादी जिवंत राहणार नाही'.'

काश्मीरमधील मातांना भारतीय लष्कराचे आवाहन

यावेळेस भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमधील पालकांना कळकळीचे आवाहनदेखील केले. ''दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना समजवा आणि माघारी बोलवा. चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समर्पण करायला लावा, असे आमचे जम्मू काश्मीरमधील मातांना आवाहन आहे.आत्मसमर्पण करणाऱ्यांसाठी आम्ही कित्येक चांगले उपक्रम राबवत आहोत. पण हातात बंदूक घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही'', असा स्पष्ट इशारा यावेळेस भारतीय लष्कराकडून देण्यात आला. 

आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत - भारतीय लष्कर

सीआरपीएफचे आयजी जुल्फिकार हसन यांनी सांगितले की, 'शहीद जवानांच्या कुटुंबीयांना स्वतःला एकटे समजू नये. तुमच्यासोबत आम्ही सदैव उभे आहोत. शिवाय, देशातील निरनिराळ्या भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी मुलांसहीत आम्ही हेल्पलाइन चालवत आहोत. जेणेकरुन त्यांना कोणत्याही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू नये'

'जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्याचा वरदहस्त'चकमकीवेळी तसंच चकमक झाल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. चकमकीच्या ठिकाणी कोणी गेल्यास आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि  ISIचा जैश-ए-मोहम्मदवर वरदहस्त आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड कामरानच होता, पिंगलान चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला. 

कोण आहे अब्दुल रशीद गाझी ?जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो आयईडी स्फोटांचा एक्स्पर्ट असल्याचेही बोलले जाते. 9 डिसेंबर2018ला तो पाकिस्तानातून काश्मीरमध्ये दाखल झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने काश्मीरमध्ये सुरू केलेल्या कॅम्पमध्ये गाझी हा प्रमुख ट्रेनर होता. तो काश्मीरमध्ये घुसल्याचे कळताच सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. गाझी हा 'जैश-ए-मोहम्मद'चा तो टॉप ट्रेनर आहे. तो यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानी अतिरेकी संघटनांमध्येही होता. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणा-या अतिरेक्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये तो प्रमुख होता आणि नव्याने संघटनेत दाखल झालेल्यांना ट्रेन करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावरच होती.  

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदपुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर