शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 12:38 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा  जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (11 जून) पहाटेपासून चकमक होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तर पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (7 जून) झालेल्या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपोरा भागात चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. 

शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. शोपियान जिल्ह्याच्या द्रागड सुगान भागात 31 मे रोजी दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलांची चकमक सुरु होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी (29 मे) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. रमजानचा महिना सुरू असल्याने दहशतवाद्यांनी तसेच लष्करानेही कारवाया करू नयेत असे आवाहन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले होते. 

लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं होतं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असून सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील त्राल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी (23 मे) शोधमोहीम राबवण्यात आली होती. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला झाकीर मुसाचा खात्मा करण्यात यश आले. शुक्रवारी सकाळी मुसाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत कमांडर अन्सार याचा देखील खात्मा करण्यात आला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी